ADVERTISEMENT
चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवसाला 'रामनवमी ' म्हणतात. वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातील हा सर्वात मोठा उत्सव. दुष्ट शक्तींना ज्यावेळी भूतलावरील सज्जनांना त्राही भगवान् करून सोडले, तेव्हा या दुष्ट शक्तीच्या निर्दालनासाठी श्रीविष्णूने भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले होते. हा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र. ज्याला पाहून मन रमते, आकर्षित होते, मनुष्य स्वतःला विसरून जातो, मुग्ध होतो, भारावून जातो अशी व्यक्ती म्हणजे राम. या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला.
तेव्हा अयोध्येचा राजा दशरथ राज्य करीत होता. त्याचं राज्य मोठं व सुखी होतं. परंतु राजा मात्र दुःखी होता. कारण त्याला मुलंबाळं नव्हते. म्हणून त्याने वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यानुसार मोठा यज्ञ केला. या यज्ञामुळे देव प्रसन्न झाले व 'ईच्छा लवकर पुरी होईल' असा आशीर्वादही दिला. महिने निघून गेले. आनंदी वातावरण अयोध्या नगरीत दिसू लागले. कौसल्या राणी प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. हा मुलगा म्हणजे राम.
श्रीराम जन्माला आले ती वेळ माध्यान्हीची होती. नक्षत्र पुनर्वसू होते. साऱ्या राज्यभर हत्तीवर बसून मूठ मूठ साखर वाटली. मोठेपणी रामाला वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी ठेवले. शिक्षणात बारा वर्षे गेली. रॅम हा सत्यवचनी व आज्ञाधारक होता. लढाईत अचूक बॅन मारिन असे म्हणून 'राम-बाण ' असा आता संकेत ठरला आहे. कित्येक राक्षसांना त्याने ठार मारले. हनुमानाच्या साहाय्याने रावणाचा वध केला.
रामाने पूढे अनेक वर्षे उत्तम राज्यकारभार केला. प्रजेला सुखात ठेवलं. कॅनाल रट्टास दिला नाही. आजही आदर्श राज्य म्हणजे रामराज्य हि वस्तुस्थिती आजच्या लोकशाहीतही मनाली जाते. आपल्या स्वातंत्र्य-लढ्याचे बाबतीतसुद्धा गांधीजींनी रामराज्याचा आदर्श सर्वांच्या नजरेसमोर ठेवला होता. महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायणामध्ये रामराज्य कसे होते, याचे वर्णन केले आहे. रामराज्याचा काळात कुठल्याही स्त्रीला विधवापणाचे दुःख नव्हते. प्रजेला सर्प किंवा व्याधीचे भय नव्हते. चोर किंवा चोरी यांची नवनिशाणी नव्हती. कुठल्याही प्रकारचा अनर्थ ऐकू येत नव्हता. या काळात कुठल्याही प्रकारची हिंसा होत नव्हती. सर्वजण रोग,शोकापासून मुक्त होते.
वास्तवामध्ये हे राज्य लोककल्याण नजरेसमोर ठेवूनच चालत होते. रामाने दुसऱ्याला दिलेले वाचन पाळण्यासाठी अनंत हालअपेष्टा सहन केल्या. दुष्टांवर वाचक बसविणे व सजनांना अभय देणे, हे त्याचे जीवितकार्य होते. राम एकबाणी, एकवचनी व एकपत्नी होता, म्हणूनच रामचंद्राला ' मर्यादापुरुषोत्तम ' म्हटले आहे. त्यापूढे जौनसेही म्हणता येईल कि, श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती, बंधू, शिष्य, पिता व आदर्श राजा होते.
राम हा विष्णूचा अवतार म्हणून सर्व लोक त्याला देवासमान मनू लागले. रामाची देवळे झाली. नंतर देवळात रामनवमीचा उत्सवही सुरु झाला. या दिवशी दुपारी गावातील मंडळी देवळात येतात. कथेकरींचे कीर्तन ऐकतात. त्यात रामजन्माचा कथा सांगतात. दुपारी बारा वाजता रामाचा जन्म झालेम्हणून त्याच वेळी हा जन्मोत्सव साजरा करतात. या वेळी पाळण्यात श्रीरामाची तसबीर ठेवलेली असते. साऱ्या देशभर हा जन्मोत्सव साजरा होतो. अयोध्येत तो मोठ्या प्रमाणात होतो. रॅम वनवासात असताना पंचवटीत राहत होते म्हणून पंचवटीत उत्सव मोठा होतो.
रामाच्या गोष्टी ऐकून त्या नेहमी कृतीत आणाव्यात. मुलांना संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणावयास घराची मंडळी सांगतात. या पृथ्वीवर रामासारखा राजा झाला नाही आणि होणार नाही. श्रीराम आपल्या अमोघ पण पवित्र शौर्याबद्दल इतके प्रसिद्ध होते कि, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी आत्मविभूती सांगताना ' रामः शास्त्रामृतामहम् ' अशी त्यांची गीतेत प्रशस्ती केली आहे.
ADVERTISEMENT